निवडणुकीत ‘मी’ कुठेही दिसत नाही. ‘मी’ म्हणजे निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा ग्राह्य न धरला जाणारा वर्ग
या ‘मी’ पुढे भ्रष्टाचार, दारिद्र्य, गरिबी, कुपोषण, दंगली, अत्याचार, बलात्कार, शोषण, अनारोग्य, अशिक्षण, व्यसनाधीनता, बेकारी असे अनेक प्रश्न आहेत. आता तरी या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. जर ‘मी’ने आपली ताकद दाखवून दिली, तर येत्या काळात ‘मी’चा इतिहास सुवर्ण अक्षरांनी रेखाटावा असा होणार आहे. कारण या ‘मी’मध्ये ९७ टक्क्यांचा समावेश होतो आणि फक्त तीन टक्के ‘मी’वर सत्ता गाजवतात.......